महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सात दुचाकी पेटवल्या; पुण्यातील घटना - पोलीस

पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातील रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सात दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवल्या आहेत. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीद्वारे आरोपीचा शोध घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सात दुचाकी पेटवल्या

By

Published : Jul 11, 2019, 1:07 PM IST

पुणे- पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातील रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सात दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवल्या आहेत. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत या सातही दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते.

रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सात दुचाकी पेटवल्या

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 2 वाजून 42 मिनिटांनी अग्निशमन दलाच्या कार्यालयात फोन आला. त्यात बालाजीनागर येथे गाड्यांना आग लागल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान ही आग कोणी लावली याचा तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीद्वारे आरोपीचा शोध घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details