बारामती (पुणे)- इंदापूर तालुक्यातील प्रतिबंधीत उजनी पाणलोट क्षेत्रात लहान माशांची अवैधरित्या चोरटी मासेमारी करणाऱ्या सात जणांना इंदापूर पोलीसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून 1 लाख 2 हजार 200 रुपये किंमतीचे 1 हजार 80 किलोग्रॅम वजनाचे वेगवेगळ्या जातींचे लहान सुकवलेली मासे जप्त केली आहेत. या आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) अकलूज बायपास येथे एका वाहनामध्ये उजणी पाणलोट क्षेत्रात लहान माशांची मासेमारी करून ते वाळवून मासळी बाजारात चढ्या भावाने विक्रीसाठी घेवून चालले असल्याची माहिती इंदापूर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अकलूज बायपास सरस्वतीनगर येथे मालवाहू जिपमध्ये ( एम.एच. 42 ए क्यु 3035) एकूण 48 सुती गोण्यांत वेगवेगळ्या जातींचे लहान आकाराची सुकवलेली माशांची पिल्ले भरलेली पोती आढळून आली. या जिपमधील नारायण आसाराम बनारे यांना या माशांबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिली. त्यांच्याकडे मासे पकडण्याचा कोणताही परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. याबाबत संजय नारायण मेटे (वय 52 वर्षे), उपविभागिय अभियांता पळसदेव (रा.बारामती) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
अटक आरोपी