महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा - Y grade security Adar Punawala

कोरोनावरील कोविशील्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. केंद्रीय गृहविभागाने या संदर्भातील नोटीस काढली असून आदर पुनावाला यांना संपूर्ण भारतात ही वाय सुरक्षा असणार आहे आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा व्यवस्था असणार आहे.

Adar Punawala
आदर पुनावाला

By

Published : Apr 29, 2021, 1:20 AM IST

पुणे - कोरोनावरील कोविशील्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. केंद्रीय गृहविभागाने या संदर्भातील नोटीस काढली असून आदर पुनावाला यांना संपूर्ण भारतात ही वाय सुरक्षा असणार आहे आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा व्यवस्था असणार आहे.

हेही वाचा -उत्तर पुणे जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा

सिरम इन्स्टिट्यूटने नुकतेच कोविशील्ड लसीचे दर जाहीर करत 50 टक्के लस खुल्या बाजारात विक्री करण्याचे जाहीर केले होते. यासाठी सिरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकार, राज्य सरकार, तसेच खासगी विक्रीसाठी कोविशील्ड लसीचे वेगवेगळे दर जाहीर केले होते. हे दर जाहीर झाल्यानंतर दरांवरून वाद सुरू झाला होता, तसेच काही संघटनांकडून याचा विरोधही केला जात होता. मंगळवारीच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रवेशद्वारा जवळ कोविशील्ड लसीचे दर कमी करण्यासाठी निदर्शने देखील केली होती. ही सगळी पार्श्वभूमी असताना आता केद्र सरकारने आदर पुनावाला यांना सुरक्षा पुरवली आहे.

हेही वाचा -राज्य सरकार पुण्याबाबत दुजाभाव करत आहे, जगदीश मुळीक यांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details