पुणे :केंद्र सरकारने लसीकरणाची परवानगी दिल्यानंतर, आज सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीचे डोस बाहेर पडले. आमच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस असून, गेल्या आठ ते नऊ महिन्यांच्या अथक मेहनतीचे हे फळ असल्याचे कंपनीेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.
१ कोटी डोस बाहेर..
पहिल्या टप्प्यामध्ये सरकारला आम्ही एक कोटी दहा लाख डोस दिले आहेत. तसेच, आणखी उत्पादन सुरू असून एकूण दहा कोटी डोस आम्ही सरकारला देणार असल्याचेही अदर यांनी सांगितले. सुरुवातीला सरकारला आम्ही २०० रुपये प्रति डोस या दराने आम्ही लस देत आहोत. दहा कोटी डोसेसनंतर आम्ही ही लस एक हजार रुपये प्रति डोस या बाजारभावाने विकू, असेही अदर यांनी स्पष्ट केले.