अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद पुणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन राज्य सरकारने नुकतेच मागे घेतले आहे. कॅटने वारंवार राज्य सरकारला त्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी अहवाल मागीतला होता. सरकारने अहवाल सादर न केल्याने त्यांचे निलंबन रद्द करण्याचे आदेश कॅटने दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कॅटला अहवाल का दिला नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या संदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात आज पत्रकार परिषद घेत परमबीर सिंह यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
'परमबीर सिंह यांचे निलंबन रद्द करण्याचा आदेश बेकायदेशीर, आरोपींना संरक्षण देणारा आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.' - माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख
परमबीर सिंह यांच्यावर गंभीर गुन्हे :मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात किमान 8 ते 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत. खंडणी, कायद्याचा गैरवापर असे गंभीर त्यांच्याविरोधात नोंदवले आहेत. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या जिलेटिनच्या प्रकरणामागे परगबीर सिंह हे सूत्रधार आहेत असा आरोप देखील अनिल देशमुख यांनी केला आहे.
आरोपपत्रात परमबीर सिंहांचा सहभाग : मी गृहमंत्री असतांना परगबीर सिंह यांची खालच्या पदावर बदली केली होती. तसेच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात परमवीर सिंहची या प्रकरणात प्रमुख भूमिका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मनसुख हिरेन हत्याकांडातील आरोपी प्रदीप शर्माचा जामीन अर्ज फेटाळताना परमबीर सिंह यांना सरंक्षण का दिले जाते असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला होता. अंबानींच्या घरासमोर जिलेटिन ठेवण्याऱ्या प्रकरणात परमबीर सिंह सहभागी असतानाही कोणतीही कारवाई त्याचंयावर केली नाही. उलट त्यांना संरक्षण का दिले जात आहे, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारला होता. त्याचे पुढे काय झाले असे देशमुख म्हणाले.
14 महिने तुरुंगवास : काही राजकीय विरोधकांनी परमवीर सिंह यांना माझ्यावर आरोप करायला लावले. माझ्यावर आरोप करून ते ७ महिने फरार झाले. अनेकवेळा विचारणा करूनही त्यांनी न्यायालयात किंवा न्यायमूर्ती चांदीवाल यांच्यासमोर कोणताही पुरावा सादर केला नाही. याउलट प्रतिज्ञापत्र सादर केले की, मी हे आरोप केवळ ऐकून केले आहेत. माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. पण त्याच्या खोट्या आरोपावरून मला 14 महिने तुरुंगात राहावे लागले. न्यायालयाने जामीन मंजूर करताना अनिल देशमुख यांच्यावरील आरोप हे ऐकीव आहेत, पुरावे नाहीत, असे सांगितले.
परमबीर सिंहांना बक्षिस :परमबीर सिंह यांच्या राजकीय वापरामुळे माझी फसवणूक झाली. परमबीर सिंह यांच्यामागे एक अदृश्य राजकीय शक्ती आहे. राज्य सरकारने कॅटला अहवाल न देणे, परमवीर सिंग यांचे निलंबन राज्य सरकारने एकतर्फी रद्द करणे तसेच माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी राज्य सरकारने परमवीर सिंह यांना दिलेले बक्षीस आहे, असेही देशमुख म्हणाले.
हेही वाचा -
- BMC Election : 'मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना ५० चा आकडाही पार करू शकणार नाही'
- Arvind Kejriwal : केजरीवाल मुंबईत घेणार शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट, केंद्राच्या 'या' अध्यादेशाविरोधात समर्थन मागणार
- Pandharpur Vari : पंढरपूर वारीची शंभर वर्षांपासून परंपरा; अमरावतीच्या नारायण गुरु मठातून 1924 पासून निघते पालखी