महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या धर्तीवर माणिकडोह बिबट निवारा केंद्रात बिबट्यांसाठी स्वतंत्र क्वारंटाइन कक्ष - बिबट्यांसाठी क्वारंटाइन कक्ष पुणे

सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. माणसांप्रमाणे आता प्राण्यांच्याही आरोग्याची काळजी घेतली जात आहे. प्राण्यांना कोरोना होऊ नये यासाठी आता पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात बिबट्यांसाठी स्वतंत्र क्वारंटाइन कक्ष बनवण्यात आला आहे.

pune
पुणे

By

Published : May 9, 2021, 7:17 PM IST

Updated : May 9, 2021, 8:10 PM IST

जुन्नर -जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कोरोनाचा संसर्ग माणसांप्रमाणे प्राण्यांनाही होऊ नये यासाठी पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात बिबट्यांसाठी स्वतंत्र क्वारंटाइन कक्ष बनवण्यात आला आहे.

माणिकडोह बिबट निवारा केंद्रात बिबट्यांसाठी स्वतंत्र क्वारंटाइन कक्ष

'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वन्यप्राणी प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशनुसार, बिबट्याचे निगा राखण्याचे उपाय माणिकडोह येतील बिबट्या निवारण केंद्रात अवलंबविले जात आहेत. बिबट्या आजारी पडल्यास त्याला त्याच ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवले जाते. त्यासाठी स्वतंत्र पिंजऱ्यांची व्यवस्था वनविभागाकडून करण्यात आली आहे. जुन्नर परिसरात आढळून येणारे बिबटे व निवारा केंद्रातील बिबट्यांना आजारपणाची लक्षणे दिसून येऊ लागल्यास त्यांच्या विलगीकरणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. बिबट निवारा केंद्र व परिसरातील प्राण्यांना आजारपणात वैद्यकिय सेवा व आरोग्य तपासणीसाठी प्रयोगशाळा व उपचार खोलीची सुविधा करण्यात आली आहे. बिबट्यासाठी रोजचे मांस घेत असताना कमालीची दक्षता घेतली जात आहे', असे बिबट निवारा केंद्राकडून सांगत आले आहे.

जुन्नर परिसरातील बिबट्यांची संख्या लक्षात घेता बिबट्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी वनविभागाने आतापासून तयारी करुन उपचारासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. त्यामुळे बिबट्यांचीही माणसांप्रमाणेच सर्व काळजी घेताना वनविभाग दिसत आहे.

हेही वाचा -कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या, जयंत पाटील यांनी पंतप्रधानांना करून दिली आठवण

हेही वाचा -सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे कौतुक केल्याने फडणवीसांची पोटदुखी - सचिन सावंत

Last Updated : May 9, 2021, 8:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details