पुणे :ज्येष्ठ वृत्तनिवेदक विश्वास मेहेंदळे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. मेहेंदळे यांनी काही काळ महाराष्ट्र शासनासाठीही काम केले आहे. ( Senior reporter Dr Vishwas Mehendale ) ज्येष्ठ माध्यमकर्मी अशी ओळख असणारे विश्वास मेहेंदळे यांनी सुरुवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही काळ नोकरी केली होती. ( passed away at age 84 )
18 हून अधिक पुस्तकांचे लेखन : विश्वास मेहंदळे वृत्तनिवेदक, लेखक तसेच अभिनेता म्हणून देखील त्यांनी काम केले होते. अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनासोबतच 18 हून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. याव्यतिरिक्त मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार म्हणूनही ते ओळखले जायचे. ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकही होते. तसेच पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख होते. सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशनचे ते संस्थापक होते. (Vishwas Mehendale death)
पहिले वृत्तनिवेदक :दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी बातम्या वाचणारे विश्वास मेहेंदळे हे पहिले वृत्तनिवेदक होते. त्यानंतर मुंबई दूरदर्शनचेही ते पहिले वृत्तनिवेदक होते. विश्वास मेहेंदळे यांनी मुंबई दूरदर्शन केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालकही होते. तसेच, 18 हून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. याशिवाय अनेक नाटकांमध्ये भूमिकाही साकारल्या आहेत.