पुणे - 'झुलवा' कादंबरीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. आपल्या साहित्यातून त्यांनी उपेक्षित आणि ग्रामीण जीवनाची ओळख महाराष्ट्राला करून दिली. त्यांच्या अतिशय गाजलेल्या 'झुलवा' कादंबरीमुळे त्यांना 'झुलवाकार' नावाने ओळखले जात होते.
तुपे यांच्या अनेक कादंबऱ्यांना पुरस्कार मिळाले. त्यांच्या 'आंदण' या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. 'काट्यावरची पोट' या आत्मकथेलाही महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला होता. तर झुलवा कादंबरीलाही राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या चिपाड, भसम, माती आणि माणसं, खुळी, नाक्षारी, कळा, कळाशी, इंजाल, झावळ या कादंबऱ्याही विशेष गाजल्या.