महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात यांचे निधन - senior reporter abhinandan thorat died

सर्वांचे लाडके चिंतन ग्रुपचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात (वय ६५) यांचे काल शनिवारी आजारपणामुळे दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी ८ ते १० वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी (शिवसृष्टी अपार्टमेंट, शिवाजी हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रोड, पुणे) येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर, सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांची अंत्यविधी होणार आहे.

reporter abhinandan thorat pune
ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात

By

Published : Feb 16, 2020, 9:42 AM IST

पुणे- सर्वांचे लाडके चिंतन ग्रुपचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात (वय ६५) यांचे काल आजारपणामुळे दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी ८ ते १० वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्याघरी (शिवसृष्टी अपार्टमेंट, शिवाजी हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रोड, पुणे) येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

त्यानंतर, सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी कांचन, दोन मुले मंदार, चिंतन, स्नुषा स्वाती, जान्हवी, नात इंद्रायणी, तीन भाऊ अशोक, स्वागत, निर्मलचंद्र व चिंतन ग्रुप असा मोठा परिवार आहे.

हेही वाचा-'कीर्तन करायचं की शेती, हा ज्याचा त्याचा प्रश्न ; मात्र 'त्यांनी' महिलाबाबत अपमानास्पद बोलू नये'

ABOUT THE AUTHOR

...view details