दौंड (पुणे) -दौंड - पाटस राज्यमार्गावर विरोबावाडी गावाच्या हद्दीत एसटी बसमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये या नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. कचरू माधव मुळीक (वय ७६, रा. बाबुर्डी वढे, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पुणे : एसटीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू - एसटीमध्ये वृद्धाचा मृत्यू दौंड
दौंड - पाटस राज्यमार्गावर विरोबावाडी गावाच्या हद्दीत एसटी बसमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये या नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. कचरू माधव मुळीक असे या व्यक्तीचे नाव आहे.
![पुणे : एसटीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू Senior citizen dies of heart attack](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9716812-651-9716812-1606740239040.jpg)
हृदय विकाराने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
सोमवारी श्रीगोंदा आगारातील कर्जत ते पुणे एसटी बस (एमएच 14 बीटी 1052) ही कर्जतवरून पुण्याकडे जात असताना, दौंड ते पाटस रस्त्यावर बिरोबावाडीमध्ये चहासाठी थांबली होती. याचवेळी कचरू मुळीक यांना चक्कर आल्याने ते बसमध्ये कोसळले. चालक व वाहकाने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.