पुणे - शौचास जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा भरधाव वेगात असणाऱ्या क्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना पिंपरीमध्ये शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. बबन केरू साळवे (वय ६०) असे मृताचे नाव असून क्रेन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
VIDEO: शौचास जाणाऱ्या वृद्धाचा क्रेनच्या धडकेत मृत्यू - pimpri crane accident
मृतक बबन साळवे हे रस्ता ओलांडून शौचास जात होते. दोन्ही बाजुने येणाऱ्या वाहनांकडे त्यांचे लक्ष होते. एवढ्यात भरधाव क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
VIDEO: शौचास जाणाऱ्या वृद्धाचा क्रेनच्या धडकेत मृत्यू
हेही वाचा -जाणून घ्या... अमेरिकेच्या अध्यक्षांची सुरक्षा व्यवस्था कशी असते?
मृतक बबन हे रस्ता ओलांडून शौचास जात होते. दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांकडे त्याचे लक्ष होते. एवढ्यात भरधाव क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या क्रेन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण करत आहेत.
Last Updated : Feb 22, 2020, 11:31 PM IST