महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mahaparinirvan Din 2022 : पुण्यातील ज्येष्ठ लेखक न.म. जोशींनी दिला डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा

Mahaparinirvan Din 2022: पुण्यातील ज्येष्ठ लेखक न.म. जोशींनी दिला डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा बाबासाहेबांनी प्रत्येक विषयावर सखोल चिंतन व अभ्यास केला. आपल्या विचारांना विविध चळवळी व आंदोलनाच्या माध्यमातून मूर्त रूप दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देत असताना पुण्यातील ज्येष्ठ लेखक डॉ. न. म. जोशी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर झालेली भेट तसेच अनेक आठवणींना उजाळा दिला. डॉ.न.म.जोशी यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2022
Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2022

By

Published : Dec 6, 2022, 10:10 AM IST

पुणे:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण भारतावर दुःखाचा डोंगर कोसळला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक, पत्रकार असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. इतकच नव्हे तर त्यांना 'भारतीय राज्यघटनेचे जनक' म्हणूनही ओळखलं जाते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुण्यातील ज्येष्ठ लेखक डॉ. न. म. जोशी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर झालेली भेट तसेच अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा

अशी झाली भेट:सन १९५१ आली डॉ. न. म. जोशी हे ११ वर्षेचे असताना शाळा शिकून ते पेपर टाकायचे काम करत होते. पुण्यातील नारायण पेठ येथे आचार्य ना.वा. तुंगार हे पालीचे पंडित राहत होते. त्यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू होते. एके दिवशी सकाळीच तुंगार हे काही कागदपत्र घेऊन बाहेर उभे होते. मी जेव्हा अंक टाकायला गेलो. तेव्हा बघितले आणि तुंगार यांना विचारले, तर ते म्हणाले की माझ्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटायला येणार आहे. बाबासाहेब बहुतेक बौध्द धर्म स्वीकारणार आहे. त्यानंतर त्यांनी स्वीकारला पण त्यासाठी ते तुंगार यांना भेटले होते. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे येणार होते. तेव्हा न. म. जोशी हे तुंगार यांच्या घराबाहेर सायकल लावून थांबले होते. तेव्हा काही वेळा मोदी गणपती समोरून एक काळी कलरची गाडी आली.

बाबासाहेबांनी अंक घेतला:ती तुंगार यांच्याघरासमोर थांबली. त्यातून एक सूटबुटात असलेले व्यक्ती बाहेर आला. तुंगार यांच्याबरोबर बैठक झाल्यानंतर तुंगार यांनी म्हटले की, तो मुलगा तुमचं दर्शन घ्यायला थांबला आहे. तेव्हा ते म्हणाले की दर्शन कसले मी काय देव आहे का? ये इकडे आणि मला बोलावले. तेव्हा मी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली. त्यांनी मला विचारले की काय करतो? मी शाळेबरोबर पेपर टाकायचे काम करतो. बाबासाहेबांनी माझ्याकडील अंक घेतला आणि मला आशीर्वाद दिला. तेव्हापासून माझ्या लेखकाच्या खऱ्या प्रवासाला सुरवात झाली, असे यावेळी न. म. जोशी यांनी सांगितले आहे.

बाबासाहेबांचा द्रष्टेपणा आधुनिक काळातील पुढाऱ्यांनी घेतला पाहिजे:देशातील तसेच राज्यातील परिस्थितीती पाहता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला व्यासंग आणि अभ्यास याची आठवण होते. त्यांची प्रत्येक गोष्ट ही व्यासंग आणि अभ्यासावर आधारित होती. बाबासाहेबांनी ज्या चळवळी केल्या आहेत. त्यामुळे त्यांना विद्रोही मानतात. मी ही त्यांना विद्रोही मानतो. पण मी त्यांना द्रष्टा विद्रोही मानतो. कारण द्रष्टा हे विशेषण खूप महत्त्वाचं आहे. कारण उद्या काय घडणार आणि जीवन म्हणजे काय आहे. याच द्रष्टेपण त्यांच्यात होत. त्यामुळे त्यांचे विद्रोहपण हे देखील त्यांच्या द्रष्टेपणामुळे आला होता. आणि तो आधोनिक काळातील पुढाऱ्यांनी घेतला पाहिजे. नुसता वद्रोहपणा घेऊन चालणार नाही, असे देखील यावेळी न.म.जोशी यांनी सांगितले आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर लिहिले पुस्तक:जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर भेट झाल्यानंतर त्यांच्या विचाराने प्रभावित होवून डॉ. न. म. जोशी यांनी १९८५ साली बाबासाहेबांच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिले. शिवाय जोशी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवादन देखील केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details