महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडरची अधिक किंमतीला विक्री, दौंड तालुक्यात 2 जणांवर गुन्हा दाखल - दौंड ऑक्सिजन सिलेंडर न्यूज

दौंड तालुक्यातील पाटस येथील नागेश्वर गॅस सप्लायर्स आणि दौंड येथील श्रीनाथ इंटरप्रायजेस या दोन दुकानांच्या मालकांवर मेडिकल ऑक्सिजन सिलेंडरची अधिक किंमतीला विक्री केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलीस स्टेशन
मेडिकल ऑक्सिजन सिलेंडरची अधिक किंमतीला विक्री, दौंड तालुक्यात 2 जणांवर गुन्हा दाखल

By

Published : Jun 13, 2021, 8:13 PM IST

दौंड - कोविड काळात अधिक दराने ऑक्सिजन सिलेंडरची विक्री करणाऱ्या दौंड तालुक्यातील दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथील नागेश्वर गॅस सप्लायर्स आणि दौंड येथील श्रीनाथ इंटरप्रायजेस या दोन दुकानांच्या मालकांवर मेडिकल ऑक्सिजन सिलेंडरची अधिक किंमतीला विक्री केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक विजय विठ्ठल नांगरे यांनी फिर्याद दिली आहे.

दौंड पोलीस स्टेशनमध्ये एकावर गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अन्न आणि औषध प्रशासनाचे दौंड, बारामती, पुरंदर, इंदापूर या तालुक्यांचे औषध निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले विजय विठ्ठल नांगरे यांनी दौंड येथील श्रीनाथ इंटरप्रायजेस शाॅप नं. 8 गजानन सोसायटी यांच्याकडील मेडीकल ऑक्सिजन भरलेला सिलेंडरचा खरेदी व विक्री अभिलेखा पडताळला असता सदर वितरकाने रूग्णालयांना जास्त किंमत आकारून विक्री केल्याचे आढळून आले आहे. याबाबत सचिन गोपाळराव चांदेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड काळात ऑक्सिजन सिलेंडरची चढ्या दराने विक्री केल्याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे निरीक्षक विजय विठ्ठल नांगरे यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.


यवत पोलीस स्टेशन येथे एकावर गुन्हा दाखल
दौंड तालुक्यातील पाटस येथील नागेश्वर गॅस सप्लायर्स अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षकांनी पाटस येथील नागेश्वर गॅस सप्लायर्स या वितरकाकडील मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर खरेदी - विक्रीचा अभिलेखा पडताळला असता , सदर वितरकाने जास्त किमतीने मेडिकल ऑक्सिजन सिलेंडरची हॉस्पिटल्सना विक्री केल्याचे आढळून आले. तसेच सदर वितरकाकडे अन्न व औषध प्रशासनाचा परवाना (नमुना बी) नसताना विक्री करत असल्याचे आढळून आले आहे. नागेश्वर नागेश्वर गॅस सप्लायर्सचे मालक नवनाथ महादेव बिनवडे (रा. तामखडा, पाटस) यांच्यावर कोविड काळात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यावरून यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक विजय विठ्ठल नांगरे यांनी फिर्याद दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details