पुणे -जिल्हा परिषद व आरोग्य विभागाची यंत्रणा कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी तयारीला लागली आहे. जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाने 1 ते 31 डिसेंबर या दरम्यान एकसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. टीबी व छातीचे आजार असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत असून त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. तपासणीसाठी तुमच्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयूष प्रसाद यांनी नागरिकांनी केले आहे.
आयुष प्रसाद पुणे जिल्ह्याचा दौरा करून याबाबत नियोजन करत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना कुठल्या प्रकारची लक्षणे असणार, याबाबत अद्याप माहिती नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व आरोग्य विभागाकडून 13 तालुक्यांतील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली टीम तयार करण्यात येणार आहे.