महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात सोमवारपासून कोरोना लसीचा दुसरा डोस - corona vaccine latest news

राज्यात सोमवारपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस दिला जाणार आहे. पहिला डोस देऊन ज्यांना 28 दिवस झाले आहेत त्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. राज्यात शनिवारपर्यंत 6 लाख 83 हजार 4 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात सोमवारपासून कोरोना लसीचा दुसरा डोस
राज्यात सोमवारपासून कोरोना लसीचा दुसरा डोस

By

Published : Feb 14, 2021, 3:25 PM IST

Updated : Mar 2, 2021, 2:04 PM IST

मुंबई -देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. राज्यात सोमवारपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस दिला जाणार आहे. पहिला डोस देऊन ज्यांना 28 दिवस झाले आहेत त्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. राज्यात शनिवारपर्यंत 6 लाख 83 हजार 4 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.


दुसरा डोस
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने गेल्या वर्षी मार्चमध्ये महाराष्ट्रात शिरकाव केला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारचा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. अकरा महिन्यांनी कोरोनाचा प्रसार कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. त्याचवेळी केंद्र सरकारने कोव्हीशिल्ड व को वॅक्सिन या दोन लसींना मान्यता दिली आहे. 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यात 6 लाख 83 हजार 4 लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड ही लस देण्यात आली. तसेच 5 हजार 672 लाभार्थ्यांना को-वॅक्सिन ही लस देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यांना 28 दिवसांनी लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. उद्या सोमवारपासून हा लसीचा डोस दिला जाणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून दिली जाणार आहे.

जिल्हानिहाय आकडेवारी -
अहमदनगर 26057
अकोला 8955
अमरावती 16220
औरंगाबाद 18386
बीड 10003
भंडारा 8079
बुलढाणा 12708
चंद्रपूर 16049
धुळे 9882
गडचिरोली 9177
गोंदिया 7961
हिंगोली 5049
जळगांव 13879
जालना 9791
कोल्हापूर 20394
लातूर 10820
मुंबई 109083
नागपूर 30179
नांदेड 12074
नंदुरबार 8858
नाशिक 30857
उस्मानाबाद 6886
पालघर 18436
परभणी 5867
पुणे 62887
रायगड 10423
रत्नागिरी 9778
सांगली 17494
सातारा 26452
सिंधुदुर्ग 6239
सोलापूर 26452
ठाणे 66264
वर्धा 14673
वाशीम 5414
यवतमाळ 11596

एकूण 6,83,004

Last Updated : Mar 2, 2021, 2:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details