पुणे - राज्य मंडळाचा इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम यंदाच्या वर्षापासून बदलण्यात आला आहे. या नवीन अभ्यासक्रमात गणित विषयाच्या पुस्तकात सर्वात महत्वाचा बदल करण्यात आला आहे. मुलांना जोडाक्षरांची भीती नको म्हणून यापुढे जोडाक्षरे वेगळ्या पद्धतीने वाचता येणार आहेत. पूर्वी १० अधिक १ अकरा असे बोलले जायचे, आता १० आणि १ असे सोप्या पद्धतीने बोलता येणार आहे.
दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात महत्वाचा बदल, आता जोडाक्षरे वेगळ्या पद्धतीने वाचता येणार - -mathematical-book
राज्य मंडळाचा इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम यंदाच्या वर्षापासून बदलण्यात आला आहे. या नवीन अभ्यासक्रमात गणित विषयाच्या पुस्तकात सर्वात महत्वाचा बदल करण्यात आला आहे.

तसेच १७ हा अंक असेल तर १७ सोबतच १० आणि ७, २८ सोबतच २० आणि ८, ७३ सोबतच ७० आणि ३ असा बदल करण्यात आला आहे. अशा पद्धतीने संख्या शिकवल्या जाणार आहेत. दक्षिणेकडच्या राज्यात हीच पद्धत प्रचलित आहे असा दाखला देण्यात आला आहे. जेष्ठ गणितज्ञ मंगला जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास मंडळाने हा बदल सुचवला आणि बालभारतीने नवीन पुस्तक छापून तो अंमलात आणला आहे. मात्र हा निर्णय चुकीचा आहे, यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडेल आणि व्यवहारात जोडाक्षरासहित आकडेमोड असल्याने ही मुले अडाणी ठरतील अशी भीती काही जणांकडून व्यक्त केली जात आहे.
साडेबारा, सव्वा पंचवीस या संख्याबाबत तुम्ही काय करणार असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे. बालभारतीची पुस्तके न वापरणारे विद्यार्थी आधीचीच प्रचलित पद्धत वापरणार असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होईल त्यामुळे हा बदल अव्यवहार्य, अनावश्यक आहे असे मत व्यक्त केले जात आहे.