पुणे - जागतिक विज्ञान दिनानिमित्त आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ( Science Day Pune University ) सायन्स पार्कमध्ये लहान मुलांसाठीचे अनेक रंजक वैज्ञानिक प्रकल्प सादर करण्यात आले. ( Science Demonstration in Scince Park Pune ) खुद्द विद्यार्थ्यांनी यात निरनिराळे प्रयोग केलेले पाहायला मिळाले. आज विज्ञान दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'सायन्स पार्क'च्या नवीन इमारतीचं उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी यांच्या हस्ते झालं. ( Baba Kalyani Inaugrate Science Park Builiding Pune ) यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञातातील विविध प्रयोगांचे सादरीकरण करत अनेकांना चकित केलं.
ईटीव्ही भारत प्रतिनिधीचा आढावा वेगवेगळे प्रयोग -
या प्रयोगांमध्ये प्रकाशाचे वर्तन, डीएनए मॉडेल, चुंबकीय गुणधर्म दर्शविणारे प्रयोग , त्याच बरोबर स्मार्ट सिटीचा भव्य देखावा देखील साकारण्यात आला होता.या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बाबा कल्याणी बोलत होते. यावेळी परसिस्टंट सिस्टीम कंपनीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे, प्राज इंडस्ट्रीचे संस्थापक व कार्याध्यक्ष डॉ.प्रमोद चौधरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, प्रतिष्ठित प्राध्यापक आणि सायन्स पार्कचे समन्वयक डॉ. दिलीप कान्हेरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा -Visit 12 Jyotirlingas on Mahashivratri : महाशिवरात्री निमित्ताने करा 12 ज्योतिर्लिंगांंचे दर्शन
विद्यापीठातील 'सेन्टर फॉर सायन्स एज्युकेशन अँड कम्युनिकेशन' म्हणजेच सायन्स पार्कची सुरुवात २०१४ साली करण्यात असून आज सायन्स पार्क नव्या इमारतीत आज याचा नव्याने शुभारंभ करण्यात आला. यावेळी जवळपास १०० वैज्ञानिक प्रकल्पांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.