महाराष्ट्र

maharashtra

घंटा वाजणार ! 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू; प्रशासन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तयारीत

गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली शाळा पुन्हा एकदा 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे शाळेची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

By

Published : Nov 20, 2020, 1:37 PM IST

Published : Nov 20, 2020, 1:37 PM IST

शाळा
शाळा

पुणे - कोरोनाच्या पाश्वभूमीवर 22 मार्चला राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पुन्हा हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येऊ लागले आहे. गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली शाळा पुन्हा एकदा 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यासाठी शाळांनी तयारी सुरू केली आहे. पुण्यातील नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणेसंचलित स्व. तु. गो. गोसावी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाने आजपासून शाळेची साफसफाई आणि निर्जंतुकीकरणास सुरुवात केली आहे.

गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली शाळा पुन्हा एकदा 23 नोव्हेंबरपासून सुरू

90 टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्याची शक्यता -

राज्यात मुंबईवगळता 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होत आहेत. कोरोनाच्या या संकटामुळे अजूनही पालक आपल्या पाल्याना शाळांमध्ये न पाठवण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनापुढे आव्हान असणार आहे. पुण्यातील स्व. तु. गो. गोसावी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेतले आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद झाला आहे. मात्र, अजूनही काही पालक गावाला गेल्याने त्यांच्याशी संवाद झालेला नाही. 23 तारखेनंतर 90 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असेल, अशी अपेक्षा महाविद्यालयाचे मुख्यध्यापक किरण सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

शाळेची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करणे सुरू

शिक्षकांची होणार आरोग्य तपासणी -

शिक्षकांना महाविद्यालय प्रशासनाने दोन दिवस अगोदरच शाळेत बोलावले असून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

एका वर्गात फक्त 20 विद्यार्थी -

कोरोना महामारीपूर्वी एका वर्गात जवळपास 50 विद्यार्थी बसत होते. मात्र, आता शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्था करण्यात येणार आहे. आता एका वर्गात फक्त 20 विद्यार्थ्यांना बसविण्यात येणार आहे. यामुळे आता वर्गांचे प्रमाणही वाढणार असून तशी व्यवस्थाही महाविद्यालयाकडून करण्यात आली आहे.

शाळेची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करणे सुरू

प्रत्येक विद्यार्थ्याचे दररोज चेकिंग -

शाळा सुरू झाल्यानंतर दररोज विद्यार्थ्यांची तपासणी, सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही सोशल डिस्टन्सिंगमध्ये वर्गात बसविण्यात येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला काही त्रास असेल, तर त्याला शाळेत बसवण्यात येणार नाही.

प्रशासनाची जबाबदारी वाढली -

पालकांपेक्षा प्रशासनाची जबाबदारीजास्तवाढली आहे. शिक्षक, विद्यार्थी तसेच कर्मचारी या प्रत्येकाची जबाबदारी घेऊन शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार महाविद्यालय प्रशासन काम करणार आहे. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याबाबत विशेष काळजी घेण्यात येणार आहे. अध्यापन साहित्य, डेस्क, टेबल, खुर्च्या इत्यादी वस्तूंची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. शाळेच्या परिसरातील सर्व कचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसेच हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हँडवॉश व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शक्य असल्यास हँड सॅनिटायझर ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा -छत्तीसगड : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिलांसाठी खास 'मोबाइल मेडिकल क्लिनिक' लाँच

ABOUT THE AUTHOR

...view details