पुणे -जिल्ह्यातील 13 तालुक्यांना निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यात 57 अंगणवाडी, 31 जिल्हा परिषद शाळा आणि 4 ग्रामपंचायत कार्यालयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली.
निसर्ग चक्रीवादळाने पुणे जिल्ह्यात शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान - Nisarga Cyclone Pune damages
निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे काल सकाळपासूनच पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यांमुळे शासकीय इमारतींचे नुकसान झाले असून यामध्ये शाळांचा समावेश आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन दुरुस्तीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी केली आहे.
काल सकाळपासूनच पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यांमुळे शासकीय इमारतींचे नुकसान झाले असून यामध्ये शाळांचा समावेश आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन दुरुस्तीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी केली आहे.
खेड, आंबेगाव, जुन्नर, मुळशी, मावळ, हवेली या तालुक्यात शाळा आणि अंगणवाड्यांची पडझड झाली आहे. इमारतींच्या नुकसानीबरोबर शालेय पुस्तके, ई-लर्निंग साहित्या व इतर साहित्यांचे नुकसान झाले आहे.