महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना कारच्या धडकेने शाळकरी मुलीचा मृत्यू

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग(Pune Solapur Highway) ओलांडताना कारने धडक दिल्याने शाळकरी मुलीचा मृत्यू(School Girl Died) झाला आहे. ही मुलगी शाळेत जात असताना हा अपघात झाला. अनुष्का अनिल गायकवाड असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

accident
कारच्या धडकेने शाळकरी मुलीचा मृत्यू

By

Published : Nov 20, 2021, 7:10 PM IST

बारामती - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या(Pune Solapur Highway) पश्चिमेला राहत असलेली शाळकरी मुलगी शनिवारी(ता.२०) सकाळी राष्ट्रीय महामार्ग ओलांडून शाळेला जात होती. यावेळी भरधाव वेगातील कारने त्या मुलीला धडक दिली. या अपघातामध्ये मुलीचा मृत्यू झाला(School Girl Died in car accident) आहे.

शाळेला निघालेल्या शाळकरी मुलीचा कार अपघातात मृत्यू झाल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे. अनुष्का अनिल गायकवाड (वय.१३ रा.राजेगांव, ता.दौंड, सध्या रा.यश हाईट्स भिगवण, ता.इंदापुर) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी अनिल गायकवाड यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कारचालक अटकेत -

अनुष्का अनिल गायकवाड ही येथील आदर्श विद्यालयामध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. शनिवारी(ता.२०) सकाळी शाळा असल्यामुळे ती रहात असलेल्या यश हाईटस् या राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेकडील वसाहतीमधून पूर्वेला असलेल्या आदर्श विद्यालय या शाळेला निघाली होती. राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे निघालेल्या भरभाव क्रेटा मोटार कारने(क्र.एम एच १४ जे एम ९५०५) तिला जोरदार धडक दिली. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी कार चालक मंदार गोपाल दामले (वय ४७ रा. निगडी प्राधीकरण,पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details