पुणे- देशाचे भवितव्य घडवणाऱ्या शाळा आता धोकादायक बनत चालल्या आहेत. सध्याच्या वादळी वाऱ्याने या धोकादायक शाळांच्या इमारती पडण्याची भीती निर्माण झाली असताना या शाळेत शिकणारे विद्यार्थी आता आम्हाला या शाळेत शिकायचे नाही, अशी भावना व्यक्त करत आहेत. तर पालकही भितीच्या छायेखाली आले आहेत.
'आम्हाला या शाळेत जायचंच नाही..' वादळी वाऱ्यात छत उडालेल्या शाळेतील विद्यार्थी भितीच्या छायेखाली
पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द गावात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याने शाळेचे छत विद्यार्थी व पालकांच्या समोरच कोसळले होते. हा प्रकार विद्यार्थ्यांनी डोळ्यांनी पाहिला. त्यामुळे आता आम्हाला या शाळेत शिकायचे नसल्याची भावना विद्यार्थी बोलून दाखवत आहेत.
खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द गावात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याने शाळेचे छत विद्यार्थी व पालकांच्या समोरच कोसळले होते. हा प्रकार विद्यार्थ्यांनी डोळ्यांनी पाहिला. त्यामुळे आता आम्हाला या शाळेत शिकायचे नसल्याची भावना विद्यार्थी बोलून दाखवत आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांमध्ये अनेक शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या आहेत. सध्याच्या वादळी वाऱयामुळे या शाळांना धोका निर्माण झाला असून या शाळा तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे. मात्र, शाळा व्यवस्थापन व जिल्हा परिषद याकडे दुर्लक्ष करत आहे.