महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे : गणेशोत्सवात शेवटचे 6 दिवस रात्री 12 पर्यंत देखावे राहणार सुरू - चंद्रकांत पाटील

आता 6 दिवस 12 पर्यंत देखावे सुरू ठेवता येतील, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यावर्षी सातव्या दिवसापासून बाराव्या दिवसापर्यंत रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी आहे.

चंद्रकांत पाटील

By

Published : Aug 30, 2019, 11:22 PM IST

पुणे- शहरात गणेशोत्सवात ६ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत देखावे बघता येतील. यापूर्वी ४ दिवसच देखावे सुरु ठेवता येत होते. मात्र, आता 6 दिवस 12 पर्यंत देखावे सुरू ठेवता येतील, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यावर्षी सातव्या दिवसापासून बाराव्या दिवसापर्यंत रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी आहे.

चंद्रकांत पाटील

यासोबतच आमचा डॉल्बीला विरोध नाही, मात्र त्याची आवाज मर्यादा ओलांडायला विरोध आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. विसर्जनाच्या दिवशी रात्री १२ नंतर वाद्य वाजवायला परवानगी देता येणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शुक्रवारी पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांची बैठक घेतली, त्यानंतर ते बोलत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details