महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माझ्या कामाची पोचपावती मिळाली - सय्यद मेहबूब - सय्यदभाई

सरकारने मुस्लीम सत्यशोधक समाज मंडळामार्फत केलेल्या कामाची दखल घेत मला पोच पावती दिली, अशी प्रतिक्रिया पुण्यातील सय्यद मेहबूब उर्फ सय्यदभाई यांनी दिली.

पद्मश्री सय्यद मेहबूब
पद्मश्री सय्यद मेहबूब

By

Published : Jan 26, 2020, 8:59 PM IST

Updated : Jan 26, 2020, 9:33 PM IST

पुणे- सरकारने मुस्लीम सत्यशोधक समाज मंडळामार्फत केलेल्या कामाची दखल घेत मला पोच पावती दिली, अशी प्रतिक्रिया पुण्यातील सय्यद मेहबूब उर्फ सय्यदभाई यांनी दिली. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

प्रतिक्रिया देताना पद्मश्री विजेते सय्यद मेहबूब


त्यांनी मुस्लीम सत्यशोधक समाज मंडळ स्थापन करून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. त्यांनी या मंडळाच्या माध्यमातून समाज नागरी हक्क कायदा व्हावा, तिहेरी तलाक पद्धत बंद व्हावी, महिलांनाही पुरुषांप्रमाणे सर्व अधिकार मिळावे, लग्न व घटस्फोट हे न्यायालयातच व्हावे, पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करण्यास पुरुषांना मज्जाव असावा. यासाठी त्यांनी लढा दिला.

हेही वाचा - मी जर शिवभोजन थाळी खाल्ली तर तुम्ही.... अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

ते म्हणाले, सध्या गोमांसच्या नवाने मुस्लिमांची प्रतिमा मलीन करण्याचे घातक कार्य काही बुद्धीजीवींकडून केले जात आहे. गोमांसच्या नावाने मॉब लिचिंग सारखे प्रकार देशात घडत असल्याने देशात असंतोषाची लाट पसरली आहे. हे देशात घडू नये, अशी आमची भूमिका आहे. मुस्लीमही देशाचे नागरिक असून ते भूमीपुत्र आहेत. राष्ट्रवादासाठी ते कुठे कमी पडणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

हेही वाचा - पुण्यातील ४ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत साकारला तिरंगा, पाहा व्हिडिओ

यावेळी ते सीएए, एनआरसी व एनपीआर कायद्याबाबत बोलताना म्हणाले, कोणाताही कायदा हा केवळ एकाच धर्माला लागू नसावा, तो सर्वांना समान करावा यासाठीच आम्ही समान नागरी हक्कची करत आहोत.पण, सीएए,एनआरसी व एनपीआर यात केवळ ठराविक समाजाला उद्देशले जात आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवणे योग्यच आहे. समाजाला विश्वासात घेऊन कायदे बदलले पाहिजेत. सामाजिक कायदे हे धर्माशी जोडू नये ते धर्मनिरपेक्ष असले पाहिजे, असेही सय्यद मेहबूब म्हणाले.

हेही वाचा - नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टिकेला अजित पवारांचे उत्तर, म्हणाले...

Last Updated : Jan 26, 2020, 9:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details