महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर

विद्यापीठातील क्रीडा संकुलाच्या इनडोअर हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून  कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर

By

Published : Feb 9, 2021, 10:58 AM IST

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दिल्या जाणारे जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. १० फेब्रुवारी २०२१ ला विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. विद्यापीठातील क्रीडा संकुलाच्या इनडोअर हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

या व्यक्तींना दिला जाणार पुरस्कार

विद्यापीठाच्या जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित केल्या जाणा-या व्यक्तींमध्ये डॉ. आर. एस. माळी (उच्च शिक्षण व शैक्षणिक प्रशासन क्षेत्र), डॉ. प्रशांत व्यंकटराव हिरे (शैक्षणिक व सामाजिक क्षेत्र), सुधीर गाडगीळ (सांस्कृतिक क्षेत्र), प्रा. साधना झाडबुके, (सामाजिक क्षेत्र), रत्नाकर गायकवाड (लोकप्रशासन व सार्वजनिक धोरण क्षेत्र)
डॉ. न. म. जोशी, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्र यांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details