पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे 10 प्रवर्गातील निकाल जाहीर ( Savitribai Phule Pune University Senate Election Election ) करण्यात आला असून भाजपा पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( Deputy Chief Minister Devendra Fadwanis ) यांचे बंधू प्रसन्नजीत फडवणीस यांचाही विजय झालेला आहे. दहा जागांपैकी नऊ जागांवर भाजप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाने बाजी मारत विद्यापीठ अधीसभा सदस्याच्या निवडणुकीत वर्चस्व निर्माण केलेले आहे.
निवडणुकीचा निकाल -अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे १३ हजार ५१२ मतांनी निवडून आले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून १३ हजार ९९५ मते मिळवत गणेश नांगरे निवडून आले. निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) भटक्या जमाती या जागेवर डॉ.विजय सोनवणे हे १४ हजार १०१ मतांनी निवडून आले आहे. इतर मागास वर्ग प्रवर्गातून सचिन गोर्डे पाटील हे १३ हजार ३४२ मतांनी निवडून आले आहेत. तसेच महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर १५ हजार ६४९ मतांनी विजयी झाल्या आहेत. खुल्या प्रवर्गातून प्रसेनजीत फडणवीस ४ हजार ४४७, सागर वैद्य ३ हजार ७११ , युवराज नरवडे ३ हजार २८३, दादाभाऊ शिनलकर २ हजार ५११ तर बाकेराव बस्ते २ हजार २३० मते मिळवत विजयी झाले.