दिव्यांग सौरवचे तोंड भरून कौतुकच करताना विद्यार्थी आणि पालक पुणे:यंदा देखील या बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल हा 93.73 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल हा 89.14 टक्के लागला आहे. 9 विभागांमध्ये यंदा देखील कोकण विभागाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागाचा निकाल हा 96.01 टक्के लागला आहे. तर सर्वांत कमी मुंबई विभागाचा निकाल हा 88.13 टक्के लागला आहे. आज दुपारी 2 वाजता बोर्डाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी निकाल पाहिले.
दडपण न घेता केला अभ्यास:याबाबत सौरव म्हणाला की, मी बारावीचा अभ्यास हा शेवटच्या सत्रात केला. पण तो मन लावून केला. कोणतेही दडपण स्वतःवर येऊ दिले नाही. महाविद्यालयातील मुलांकडून देखील मला खूप सपोर्ट मिळत होता. मी कोथरूड या ठिकाणी राहत असून आई-वडिलांचा साथ हा खूप मोलाचा होता. मी दिव्यांग आहे, म्हणून मला कोणीही त्रास न देता महाविद्यालयातील सर्वच मुले-मुली हे आम्ही एकत्र राहत होतो. मला अपेक्षा होती की, 80 टक्केच्या वर मार्क मिळतील पण त्यापेक्षा जास्त मार्क मिळाले आहे.
क्लासविना मिळविले यश:याबाबत सौरवची आई म्हणाली की, कोणताही क्लास आम्ही सौरवला लावला नव्हता. त्याने महाविद्यालयाच्या जोरावर एवढे टक्के मिळवले आहे. त्याला पुढे जाऊन त्याच्या इच्छानुसार तो जे करेल त्यात आम्ही त्याला मदत करू, असे यावेळी त्यांनी सांगितले.
असा बोर्डांचा निकाल: यंदा 154 विषयासाठी इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आल्या होत्या. कोकण विभागीय मंडळाचा निकाल पहिला तर यात पुणे विभागाचा निकाल हा 93.34 टक्के लागला आहे. नागपूर विभागाचा निकाल हा 90.35 टक्के,औरंगाबाद विभागाचा निकाल हा 91.85 टक्के लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल हा 88.13 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभगाचा निकाल हा 93.28 टक्के लागला आहे. अमरावती विभागाचा निकाल हा 92.75 टक्के लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल हा 91.66 टक्के लागला आहे. लातूर विभागाचा निकाल हा 90.37 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल हा 96.01 टक्के लागला आहे. राज्यातील एकूण निकाल हा 91.25 टक्के लागला आहे.
परीक्षेची प्रमुख वैशिष्टये: विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2023 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना प्रमुख विषयांच्या लेखी परीक्षेच्या दरम्यान किमान एक दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता. या परीक्षेचे वेळापत्रक दिनांक 30 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते. परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीयस्तरावर जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली होती. तसेच राज्यमंडळ आणि 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मार्फत नेमलेल्या 383 समुपदेशकांनी सदर परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना समुपदेशन केले. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 करीता एकूण 154 विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली. विज्ञान शाखेसाठी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या चार माध्यमातून व इतर शाखांसाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती व काड अशा सहा माध्यमांसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केलेली होती.
हेही वाचा:
- Molestation Case : अमृता फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ दुसऱया महिलेला पाठवणे पडले महागात; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा
- Arvind Kejriwal Met Sharad Pawar : मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी घेतली शरद पवारांची भेट
- Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांवर गद्दरांची गाडी चालवण्याचे दिवस; संजय राऊतांचा हल्लाबोल