पुणे: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे न्यायालयामध्ये मानहानीचा दावा ठोकण्यात आलेला असून सावरकर कुटुंबाच्या वतीने न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. एक महिन्यानंतर ही याचिका दाखल केल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु तो व्हिडिओ आमच्यापर्यंत आला नव्हता. अगोदर पुरावे गोळा केले आणि मी माझ्या वकिलांना भेट घेतल्यानंतर आम्ही दावा दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला त्या पुस्तकाचा पुरावा द्यायची जबाबदारी ही राहुल गांधीची आहे. सावरकरांचा अपमान करून, सावरकरांविषयी बोलून राजकीय फायदा घेणे, हा एकमेव उद्देश त्यांचा असल्याची टीकासुद्धा सात्यकी सावरकर यांनी केलेली आहे.
न्यायालय राहुल गांधी यांना समन्स बजावेल: राहुल गांधी यांनी यापूर्वीसुद्धा सावरकरांविषयी भरपूर वक्तव्य, टीका-टीपणी केली आहे. परंतु लोकशाहीत स्वातंत्र्य असले तरी, एखाद्या देशभक्ताच्या विरुद्ध किंवा स्वातंत्र्यवीराच्या ज्याला ब्रिटिश लोक घाबरायचे त्यांच्याविषयी अशा प्रकारे लोकांमध्ये संदेश देणे हे चुकीचे आहे. हे थांबले पाहिजे. कुटुंब म्हणून आम्हालासुद्धा याचा त्रास होतो. म्हणून आम्ही न्यायालयात आता दाद मागितलेली आहे. न्यायालय राहुल गांधी यांना समन्स बजावेल, असेसुद्धा सात्यकी सावरकर यांनी म्हटले आहे.