पुणे : Sassoon Hospital Pune : नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरनंतर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात (Nagpur Medical And Mayo Death Case) देखील २३ जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ससून रुग्णालयातील स्थितीची माहिती घेतली आहे. येथे 1200 ते 1300 रुग्ण हे ऍडमिट असून, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तर ससून रुग्णालयाचा मृत्युदर हा एक टक्का असून, दिवसभरात विविध कारणाने जवळपास 10 रुग्णांचे मृत्यू (10 Patient Died) होत आहेत.
तीन महिन्यांचा औषधांचा साठा उपलब्ध : याबाबत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर (Sanjiv Thakur) म्हणाले की, सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत की, रुग्णालयात तीन महिन्यांचा औषध साठा असणे गरजेचं आहे. त्या सूचनेनुसार रुग्णालयात तीन महिन्यांचा औषधांचा साठा हा ठेवण्यात आला आहे. तसेच रुग्णाला चांगल्या दर्जाचे औषधे वेळेवर मिळावे आणि रुग्णाने हे औषधे बाहेरून अणू नये याची काळजी घेतली जात आहे. तसेच ससून रुग्णालयात सध्या 1200 ते 1300 रुग्ण हे ऍडमिट (Sassoon Hospital Admit Patient) असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. यातील 50 टक्के रुग्ण हे क्रिटिकल आहेत.