पुणे - 'लोहपुरुष' सरदार वल्लभभाई पटेल यांची आज (गुरुवार) 144 वी जयंती आहे. सरदार पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे देशात ठिकठिकाणी 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयातही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवारी सकाळी ८ वाजता विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सकाळी ८ वाजता सरदार वल्लभभाई पटेल व दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर विधानभवन ते फर्स्ट चर्च रोड, साधु वासवानी चौक, अलंकार टॉकीज, जनरल वैद्य मार्ग ते विधानभवन परिसर या मार्गावर एकता दौड संपन्न झाली. सदर कार्यक्रम हा पुण्यातील विधानभवन येथे आयोजित करण्यात आला होता.