पुणे - सारथी संस्थेत मोठा घोटाळा झाल्याच्या वृत्तानंतर या संस्थेच्या स्थापनेनंतर व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी घेतलेल्या डी. आर. परिहार यांनी पत्रकार परिषद घेत झालेल्या आरोपांचे खंडन केले आहे. संस्थेत कुठलाही घोटाळा किंवा भ्रष्टाचार झालेला नाही. एकही रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाल्यास सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन, असे सांगत परिहार यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच संस्थेला नख लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे.
"सारथी संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप खोटे, कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार" हेही वाचा - बॅंक कर्मचाऱ्यांचा संप: आझाद मैदानात सभा
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेऊन 'सारथी'मधील गैरव्यवहार आणि अवाजवी खर्चाची मांडणी केली. त्यानंतर आता सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी पत्रकार परिषद घेत, त्यांची बाजू स्पष्ट केली आहे.
परिहार म्हणाले, ओबीसी मंत्रालयाचे मुख्य सचिव जे. पी गुप्ता यांची सुरुवातीपासूनच संस्थेवर वक्रदृष्टी होती, असा आरोप करत जे पी गुप्ता यांनी संस्थेच्या निर्मितीला केवळ 7 महिने झालेले असताना 2 वर्षांचा अहवाल मागवला होता, संस्थेला निधी दिला जात नव्हता, यातून मार्ग काढत मराठा कुणबी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले. त्यातही अडवणूक केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आमच्याकडून दैनंदिन प्रशासकीय बाबीसाठी केलेल्या खर्चाचा हिशोब मागवत अनियमिततेची आवई उठवण्यात आली असल्याचे परिहार म्हणाले. संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी घेतलेल्या पुस्तक खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप केले गेले. मात्र, हे आरोप धादांत खोटे असल्याचे परिहार यांनी सांगितले. सारथीमध्ये कुठलाही भ्रष्टाचार झालेला नसून, 40 वर्षे केलेल्या शासकीय कामावरच यानिमित्ताने प्रश्न चिन्ह उठवले गेल्याने मला प्रसार माध्यमांसमोर यावे लागले आहे, असे सांगत परिहार यांनी या प्रकरणात निर्दोष असल्याचे सांगितले.
हेही वाचा - 'आर्थिक प्रश्नांवर संसदेमध्ये चांगली चर्चा होईल अशी आशा..'