महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंचर शहरात कोरोनावर मात करण्यासाठी सरपंच बनले डॉक्टर - pune corna update

मंचर शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ देणार नाही असा निर्धार करत आता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासनी सरपंच स्वत करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत सर्व तपशिलाची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात नोंद केली जात आहे.

sarapanch of manchar village
सरपंच दत्ता गांजळे

By

Published : Apr 16, 2020, 8:49 PM IST

पुणे - चाकण राजगुरुनगर परिसरात अंडे विक्री करणारा भोसरी येथील व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मंचर शहरातील किराणा दुकान, मेडिकल, बँक कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या शरिरातील तापमान तपासण्याचे काम सरपंचानीच हाती घेतले. सरपंच दत्ता गांजळे यांनी गावावर कोरोनाचे संकट येऊ नये, यासाठी त्यांनी स्वत: तपासणी सुरू केली आहे.

सरपंच दत्ता गांजळे
कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून मंचर शहरावर कोरोनाचे संकट येऊ नये, यासाठी काम सुरू केले होते. संपूर्ण शहरात सरपंच दत्ता गांजळे यांनी स्वत निर्जंतूक करण्याची फवारणी केली. त्याच काळात कोरोना झपाट्याने वाढतोय, ही गंभीर बाब लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यात सर्वात प्रथम प्रत्येक घरात किराणा, भाजीपाला, इतर अत्यावश्यक सेवा घरपोच सुरू केली. दरम्यानच्या काळात अनेकांना जेवनाची मोफत व्यवस्था केली. दिवसरात्र नागरिकांच्या संपर्कात असताना आपला संसर्ग कुटुंबात पसरू नये, यासाठी सरपंचांनी आपला मुक्काम ग्रामपंचायत कार्यालयात ठेवला आणि आज पर्यत कोरोनाशी सुरू असलेली लढाई यशस्वी केली आहे. मंचर शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ देणार नाही असा निर्धार करत आता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी सरपंच स्वत करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत सर्व तपशिलाची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात नोंद केली जात असून, कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. अशातच या कोरोनाच्या विरुद्ध सुरू असलेल्या लढाईत ग्रामस्थांनी दिलेली साथ कोरोनावर मात करण्यासाठी ताकद देत असल्याचे मत सरपंच दत्ता गांजळे यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details