महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेडा समाधीस्थळावरुन आज पालखीचे प्रस्थान; पशुच्या नावाने ही राज्यभरातील एकमेव दिंडी - Ved

संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले त्या रेड्याच्या नावाने पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीचे पुणे जिल्ह्यातून बुधवारी प्रस्थान झाले. विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या दिंड्यांपैकी पशूच्या नावाने ही राज्यभरातील एकमेव दिंडी आहे

रेडा समाधीस्थळावरुन आज पालखीचे प्रस्थान

By

Published : Jun 26, 2019, 8:06 PM IST

पुणे - जुन्नर तालुक्यातील संतवाडी येथे रेडा समाधी स्थळ असून ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात निघालेली ही दिंडी पंढरपूरकडे आज रवाना झाली. आषाढी वारीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या दिंड्यांपैकी पशुच्या नावाने ही राज्यभरातील एकमेव दिंडी आहे.

रेडा समाधीस्थळावरुन आज पालखीचे प्रस्थान

आळंदीतील तथाकथित धर्म मार्तंडानी ज्ञानेश्वर महाराजांना व त्यांच्या भावंडाना धर्मात परत घेण्यासाठी पैठण येथील धर्मसभेचे शुद्धिपत्रक मागितल्यावरुन ही भावंडे अनेक सत्व परीक्षांना तोंड देऊन आळंदीकडे निघाली. तेव्हा त्यांच्यासोबत वाकोबा कोळी आपल्या गेणोबा नावाच्या रेड्यास घेऊन निघाले असताना जुन्नर तालुक्यातील संतवाडी या ठिकाणी रेड्याला समाधी दिली होती. याच ठिकाणी रेडा समाधी स्थळ असून मागील ११ वर्षापासून ही दिंडी पंढरपूरला जाते. यंदा या दिंडीचे १२ वे वर्ष आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details