महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कार्तिकी एकादशी : तुकोबांचे मंदिरही या तीन दिवशी बंद राहणार - kartiki ekadashi dehu

गेल्या आठ महिन्यांपासून महाराष्ट्रातील मंदिर बंद होती. मात्र, विरोधकांनी विविध आंदोलन करत मंदिर खुली करण्याकडे ठाकरे सरकारचे लक्ष वेधले. तसेच भविकांचीदेखील मंदिर खुली करण्याची मागणी होती. याच पार्श्वभूमीवर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करण्यात आली.

SANT TUKARAM TEMPLE DEHU
तुकोबा मंदिर देहू

By

Published : Nov 22, 2020, 2:51 PM IST

पुणे -जिल्ह्यातील कोरोना महामारीचे वाढत असलेले रुग्ण आणि पंढरपूर कार्तिकी एकादशी निमित्त देहू येथे वारकरी आणि भाविकांची गर्दी होण्याची शक्यता पाहून देहू संस्थानने तीन दिवस 25 ते 27 नोव्हेंबर जगत्गुरू संत तुकाराम महाराज यांचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती देहू संस्थानकडून देण्यात आली आहे.

आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिर खुली -

गेल्या आठ महिन्यांपासून महाराष्ट्रातील मंदिर बंद होती. मात्र, विरोधकांनी विविध आंदोलन करत मंदिर खुली करण्याकडे ठाकरे सरकारचे लक्ष वेधले. तसेच भविकांचीदेखील मंदिर खुली करण्याची मागणी होती. याच पार्श्वभूमीवर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करण्यात आली.

हेही वाचा -'विठ्ठला'च्या दारी पुन्हा संचारबंदी; कार्तिकी वारी निमित्ताने घेतला निर्णय

जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढतेय...

पुणे जिल्ह्यात काही प्रमाणात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहेत. शिवाय, कोरोना महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान, तीन दिवसांवर पंढरपूरची कार्तिकी एकादशी येऊन ठेपली असल्याने देहू येथे जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

गर्दीच्या पार्श्वभूमीवर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे मंदिर बंद -

हे लक्षात घेता दिनांक 25 ते 27 नोव्हेंबर 2020 या कालावधीत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देहू संस्थांच्या विश्वस्थांनी घेतला आहे. या दरम्यान, मंदिरातील नित्यनियमांचे कार्यक्रम महापूजा, कीर्तन इत्यादी संस्थानंच्या वतीने होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details