राजगुरुनगर (पुणे) - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीचा पालखी सोहळा आजपासून सुरू होणार आहे. शनिवारी (दि. 13 जून) दुपारी चार वाजता माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान होणार आहे. हा सोहळा 50 जणांच्या उपस्थित पार पडणार आहे. तसेच आज(शनिवारी) पहाटे चार वाजता माऊलींच्या संजीवन समाधीवर घंटानाद, काकड आरती, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती, पहाटपूजा करण्यात आली आहे.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी नेहमीप्रमाणे होणारी वारी रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये या हेतूने आषाढी वारी सोहळा 50 जणांच्याच उपस्थित होणार आहे. यासाठी मंदिर समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. माऊलींचे मंदीर, भक्त निवास व परिसराचे निर्जंतुकिकरण करण्यात आले आहे. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी आळंदी देवस्थान, पोलीस प्रशासन, आळंदी नगरपरिषद विशेष काळजी घेत आहे.
आषाढी वारी..! संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात - कोरोना बातमी
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीचा पालखी सोहळा आजपासून सुरू होणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज