महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका दशमीला टाळ-मृदुंगाच्या गजरात गाभाऱ्यात विराजमान - sant dnyaneshwar maharaj

आषाढी वारीवरून एसटी बसमधून 13 जूनला माऊलींच्या पादुकांचे प्रस्थान झाले होते, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जे संकट आले आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आळंदीतच मुक्कामी होत्या.

aalandi
ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका दशमीला टाळ-मृदुंगाच्या गजरात गाभाऱ्यात विराजमान

By

Published : Jul 16, 2020, 1:35 AM IST

आळंदी(पुणे)- कोरोना महामारीच्या संकटात आषाढी वारी सोहळा मर्यादित वारकऱयांच्या उपस्थितीत पार पडला. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका परंपरेनुसार दशमीला टाळ-मृदुंगाच्या गजरात गाभाऱ्यात विराजमान झाल्या आहेत. हा भक्तीमय सोहळा मर्यादित भाविक वारकऱयांच्या उपस्थितीत पार पडला आहे.

ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका दशमीला टाळ-मृदुंगाच्या गजरात गाभाऱ्यात विराजमान

आषाढी वारीवरून एसटी बसमधून 13 जूनला माऊलींच्या पादुकांचे प्रस्थान झाले होते, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जे संकट आले आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आळंदीतच मुक्कामी होत्या. त्यानंतर दशमीला इतिहासात पहिल्यांदाच माऊलींच्या पादुका विठ्ठलाच्या भेटीसाठी एसटीतून पंढरीला गेल्या. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीला पंढरीला भेट झाली आणि परंपरा पार पडली. मात्र, यंदा त्याच दिवशी पादुकांच्या परतीचा प्रवास झाला. तेंव्हापासून माऊलींच्या पादुका आळंदी मंदिरातील देऊळवाड्यात मुक्कामी होत्या. मग बुधवारी दशमी दिवशी परंपरेनुसार पादुका गाभाऱ्यात विराजमान झाल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details