पुणे -संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी पालखीचा नगरप्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला. माऊलींच्या समाधीवर मर्यादित पुजाऱ्यांच्या उपस्थित सकाळी मंत्रोच्चारात पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा करण्यात आली. दुपारी एक वाजता नित्यनियमाप्रमाणे माऊलींच्या पालखीचा नगरप्रदक्षिणा सोहळा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पार पडला. यासाठी समाधी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट केली होती.
मंदिर व परिसर भाविकांविना सुने-सुने -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात संचारबंदी लागू असल्याने इतिहासात प्रथमच भाविकांविना संजीवन समाधी सोहळा साजरा झाला. त्यामुळे मंदिर व परिसर भाविकांविना सुने-सुने होते. उपस्थित असलेल्या मोजक्या भाविकांनी माऊलींच्या नगरप्रदक्षिणेवेळी टाळ-मृदूंगाच्या तालावर हरिनामाचा गजर केला.