मुंबई - रुग्णालयातून बाहेर पडताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल' असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळण्या अगोदर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांनी रुग्णालयात संजय राऊत यांची भेट घोतली होती.
राऊत म्हणाले, महाआघाडी केली म्हणजे धर्मांतर केले नाही. भाजपने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून हे पाऊल उचलावे लागले. मध्यावधी निवडणुका होणार नासल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.