पुणे :ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सावरकर यांच्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. यावर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, संजय राऊत यांना जी खासदारकी मिळाली आहे ती 41आमदारांनी मतदान केले आहे, तेव्हाच खासदारकी मिळाली आहे. सामंत आज पुण्यात बोलत होते.
संजय राऊतांकडे काही काम नाही :मी जर, त्यांच्या जागी असतो तर पहिले खासदारकीचा राजीनामा दिला असता. मग एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली असती. त्यांची दखल आपणच घेता बाकी राज्यातील जनता त्यांची दखल घेत नाही. मी त्यांच्यावर आठ, पंधरा दिवसांनी बोलत असतो. कारण माझ्याकडे खूप काम असते, त्यांच्याकडे काम काहीही नाही. सकाळी साडे नऊला तारक मेहता का उलटा चष्मासारखे तेच असतात, अशी टीका यावेळी सामंत यांनी केली. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची सात्वनपर भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आस्थीचे देखील दर्शन घेतले.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर टीका -ते पुढे म्हणाले की, हल्ली आम्हाला संजय राऊत यांच्याचं प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतात. संभाजीनगरमध्ये जे झाले त्यानंतर सगळ्यांनी जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला. पण जी साडे नऊची पत्रकार परिषद होत असते ती जातीय तेढ निर्माण करणारी असते. त्यांना जास्त महत्त्व देत नसल्याचे यावेळी सामंत यांनी सांगितले. आज महाविकास आघाडीकडून वज्रमूठ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, एक महिन्यापूर्वी रत्नागिरीत सभा झाली. गर्दी झाली आहे हे दाखविण्यात आले. यानंतर आमची सभा झाली. त्यात दहा पट लोक आली.आत्ता जी सभा होत आहे.ती तीन ते चार पक्ष एकत्र मिळून घेत आहे.