मुंबई :राज्यपालांच्या सातत्याने होणाऱ्या महापुरुषांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शनिवारी महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा अशी टीका करत हिटले. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आणि संजय राऊत ट्रोल झाले. कारण, राऊत यांनी ट्विट केलेला व्हिडिओ हा मराठा क्रांती मोर्चाचा ( Maratha organization aggressive on Sanjay Raut ) होता.
Sanjay Raut : 'छत्रपतींनी भाजपच्या नादाला लागू नये'; खासदार संजय राऊत यांच संभाजी राजे छत्रपती यांना आवाहन - Sambhaji Raje Chhatrapati Should Not Pay Attention
छत्रपतींनी भाजपच्या नादाला लागू नये असे खासदार संजय राऊत यांनी संभाजी राजे छत्रपती यांना आवाहन केले ( Sambhaji Raje Chhatrapati Should Not Pay Attention to BJP )आहे. राज्यात महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी योग्य भूमिका घ्यायला हवी. जशास तसे उत्तर योग्य त्या मुद्यांवर द्यायला हवे असही राऊत म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठा संघटना आक्रमक :राऊत यांनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या. तसेच भाजपच्या अनेक नेत्यांनी राऊत यांच्यावर टीका केली. यावर आता संजय राऊत यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, 'मराठा समाजाचा मोर्चा आमचा नव्हता का? मी कधीच म्हटलं नाही की, तो मोर्चा महाविकास आघाडीचा होता. हे लोक त्याला नैनो मोर्चा म्हणतायत. त्यामुळे मी दोन्ही मोर्चांचे व्हिडिओ टाकले आहेत. हे दोनही मोर्चे राज्याच्या स्वाभिमानासाठी होते. त्यासाठी भाजपला इतकी टिका करण्याचं कारण नाही. माझं ट्विट नीट पाहा, वाचा मी काय म्हटलंय. तोही मोर्चा आमचाच होता, महाराष्ट्राचाच ( Sanjay Raut share Maratha Kranti Morcha Video ) होता. मराठा क्रांती मोर्चाने आणि शनिवारी झालेल्या आमच्या महाविकास आघाडीच्या मोर्चानंही महाराष्ट्राची ताकद दिल्लीला दाखवलीय.'
छत्रपतींनी भाजपच्या नादाला लागू नये :चुकीचा व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे संजय राऊत सोशल मीडियावर ट्रोल झाले. या सर्व आरोप प्रत्यारोपानंतर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी देखील संजय राऊत यांच्यावर टीका केली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'छत्रपतींनी भाजपच्या नादाला लागू नये. आपण सगळे महाराजांचे मावळे ( Sanjay Raut appeal Sambhaji Raje ignore BJP call ) आहोत. राज्यात महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी योग्य भूमिका घ्यायला हवी. जशास तसं उत्तर योग्य त्या मुद्यांवर द्यायला हवं. विरोधकांना बोलू दिलं नाही तर राज्यकर्त्यांना राज्य करण्याचा अधिकार नाही. शाहु, फुलेंचा अपमान करणा-यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. बेळगाव मुद्यावर जशास तसं उत्तर देऊ म्हणणा-यांची तोंड बंद का झाली? आता जैसे थे परिस्थिती राहिलेली नाही. सीमाभागाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय पोलीसांना द्यावी.'