पुणे -शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत पुणे दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान पुणे पत्रकार संघात त्यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना रणौत, अर्णब गोस्वामी याबरोबरच निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चागंला संवाद आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर बिहार निवडणुकीबाबत बोलताना राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांची प्रशंसा केली.
राऊत कंगनाविषयी काय म्हणाले?
कंगना आता गुन्हेगार आहे, संशयित आहे. तिला समन्स पाठवले आहेत, तिने मुंबई पोलिसांसमोर हजर व्हावे, असे सांगून ती शूर मुलगी आहे, असं मला वाटायचं, असा टोला त्यांनी कंगनाला लगावला आहे.
अर्णब गोस्वामीबद्दल -
मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी करणे कितपत योग्य आहे. मी त्या चॅनलचं नाव घेणार नाही, त्यांची तेवढी त्याची लायकी नाही, असे सांगत राऊत यांनी थेट त्यांच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसेच निवडणूक आयोगही भाजपाची ब्रँच आहे. तर, मी काय बोलणार? त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असे म्हणत निवडणूक आयोगावर निशाणा साधला.