पुणे - काश्मीरमधील कलम 370 जरी हटवण्यात आले असले, तरी त्या ठिकाणी विकास करू पाहणाऱ्या विविध संस्थाना स्थानिक काश्मीरी जनतेचा सन्मान राखून आणि त्यांच्या सहभागातूनच विकास साधता येईल, असे मत सरहद्द संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी मांडले आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये काम करत आहेत.
संजय नहार यांच्याशी राहुल वाघ यांनी केलेली बातचीत हेही वाचा -राजगुरुनगर येथील थिगळे कुटुंबीयांकडून स्त्री जन्माचे वाजत-गाजत स्वागत
काश्मीरमध्ये शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांनी त्यांची केंद्र सुरू करावीत. यासाठी नहार यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, हे करत असताना फक्त काश्मीरमधील जमीन तिथला निसर्ग आणि सरकारकडून मिळणारा निधी याचा विचार करून चालणार नाही. तर तेथील जनतेला विश्वासात घेऊन आम्ही काही घ्यायला नाही, तर द्यायला आलोय. ही भावना निर्माण करणे गरजेचे असल्याचे नहार म्हणाले.
हेही वाचा -देखावे पाहण्यासाठी पुण्यातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले
यासाठी नहार यांनी काश्मीरला दिलेले मॉडेल हे काश्मीरमध्ये 'पुणे मॉडेल' म्हणून वाखानले जात असल्याचे संजय नहार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.