पुणे:संजय काकडे म्हणाले की, विरोधकाची कीव येते 1968 सालापासून बापट हे प्रचार यंत्रणेत सहभागी आहेत. 55 वर्षे झाले बापट हे राजकारणात आहेत. घोडा किती म्हातारा झाला तरी पळतो. सिंह कितीही म्हातारा झाला तरी मांस खातो. बापट यांच्या हृदयामध्ये, मनामध्ये, डोक्यामध्ये, मेंदूमध्ये राजकारणाची खुजली आहे. स्वखुशीने भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला आलेले आहे. कुणीही दबाव कुणीही प्रेशर त्यांच्यावर दिलेले नाही. त्यांना जो त्रास होतो तो शंभर टक्के होतो. असा त्रासातूनही आम्ही त्यांना मानतो. त्यांनी आम्हाला सांगितले की, आम्हाला मला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात उतरायचे आहे. त्यांच्यामुळे आमच्या सगळ्या तरुण ते वयस्कर कार्यकर्त्यांमध्ये एक जोश आणि उत्साह निर्माण झाला.
पक्षाची एवढी वाईट अवस्था नाही: कधी ते जाऊन रुग्णालयात दाखल होतात, तर कधी बाहेर फिरतात. मला स्वतः ते आठ दिवसापूर्वी माझ्या ऑफिसला भेटायला आलेले होते. त्यांच्या प्रकृतीमुळे बदल होत असल्यामुळे कदाचित दोन दिवसापूर्वी त्यांनी जाहीर केले होते की, मी प्रचार सभेत सहभागी होणार नाही. पण तब्येत बदलली असेल त्यामुळे ते सहभागी झालेत. त्यांच्यावर कुठलाही दबाव पक्षाने घातलेला नाही. भारतीय जनता पक्षाची एवढी वाईट अवस्था नाही की, कुणाच्या आजार पणाचा फायदा आपण घ्यावा. आठ दिवसापूर्वी स्वतः बापट हे माझ्या ऑफिसमध्ये आल्याचे माझी खासदार संजय काकडे यांनी सांगितले.