महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'फक्त 'भोसले' म्हणून उदयनराजे सरस नाहीत.. त्यांचे भाजपमध्ये योगदान काय?' - भाजप राज्यसभा खासदार

उदयनराजे भोसले यांचे पक्षात असे काही योगदान नाही. ते पक्षात आले आणि पडले. त्यामुळे राज्यसभेसाठी त्यांच्या नावाचा विचार होईल असे वाटत नाही, असे संजय काकडे म्हणाले.

sanjay-kakade
sanjay-kakade

By

Published : Feb 21, 2020, 4:24 PM IST

Updated : Feb 21, 2020, 6:33 PM IST

पुणे- 'मी स्वतः भारतीय जनता पक्षाचे दीड लाख सभासद नोंदवले आहेत. 2019 ची लोकसभा असो अथवा विधानसभा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेश मी पाळले आहेत. मला फडणवीस डावलतील असे वाटत नाही, डावलल्यावर बघू. परंतु, माझ्यासाठी फडणवीसच मोदी आणि शहा आहेत. त्यामुळे राज्यसभा मलाच मिळेल. मात्र, अंतिम निर्णय पक्ष घेईल', असे वक्तव्य खासदार संजय काकडे यांनी केले आहे.

बोलताना खासदार संजय काकडे...

हेही वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; पंतप्रधान मोदी व सोनिया गांधींची घेणार भेट

उदयनराजे भोसले यांचे पक्षात असे काही योगदान नाही. ते पक्षात आले आणि पडले. त्यामुळे राज्यसभेसाठी त्यांच्या नावाचा विचार होईल असे वाटत नाही. फक्त भोसले आहेत म्हणून उदयनराजे सरस आहेत, असे होऊ शकत नाही. ते छत्रपतीचे वंशज असले तरी काकडे हे सुद्धा शिवाजी महाराजांचे सरदार होते, असे म्हणत खासदारकीवर आपलाच अधिकार असल्याचे काकडे यांनी सुचित केले.

राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले यांचे नाव भाजपकडून निश्चित होण्याच्या मार्गावर असताना संजय काकडे यांनी त्याला उघडपणे विरोध केला आहे. उदयनराजेंना त्यांचा भाऊ वगळता इतर आमदारही निवडून आणता आले नाहीत असा टोलाही काकडेंनी लगावला.

सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांचा भाजपच्या तिकिटावर काही दिवसांपूर्वीच पराभव झाला होता. त्यांचे पुनर्वसन करण्याचा विचार राज्यातील भाजप नेतृत्व करत असून त्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू आहे. आता त्यावर भाजपच्या सहयोगी खासदारानेच टीका करत घराचा आहेर दिला आहे.

Last Updated : Feb 21, 2020, 6:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details