पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात चोरट्याने सांगवी परिसरातून 24 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 40 हजार लंपास केले होते. या प्रकरणी केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी फेसबुकचा वापर करून आरोपी सोबत तरुणीच्या नावाने चॅटिंग करत भेटण्यासाठी बोलवून अटक केली आहे. संदीप भगवान हांडे वय- 25 सध्या रा. वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे, मुळ गाव पिंपरखेडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कीर्ती नगर येथे राहणाऱ्या संगीता अजित कांकरिया यांच्या घरातील 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 40 हजार रोख रक्कम अज्ञाताने चोरून नेली होती.
सांगवी पोलिसांची नामी शक्कल; फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आरोपीला अटक - sangvi police news
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कीर्ती नगर येथे राहणाऱ्या संगीता अजित कांकरिया यांच्या घरातील 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 40 हजार रोख रक्कम अज्ञाताने चोरून नेली होती.
दरम्यान, कांकरिया यांच्या घरी केअर टेकर म्हणून काही दिवस काम करणाऱ्या संदीप हांडे याच्यावर संशय बळावला होता. त्याने तेथील काम सोडले असल्याने पोलिसांना देखील त्याच्यावर संशय आला होता. त्यानुसार पोलिसांनी नामी शक्कल लढवत आरोपी संदीप भगवान हांडे याला फेसबुकवर मुलीच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढले, अन काही तास बोलण्यात गुंतवून त्याला विश्वासात घेतले.
त्यानंतर, पिंपळे गुरव परिसरातील कल्पतरू याठिकाणी आरोपीला भेटण्यास बोलावून सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 20 हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक अजय भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुके, पोलीस कर्मचारी चंद्रकांत भिसे, कैलास केंगले, सुरेश भोजणे, रोहिदास बोऱ्हाडे, अरुण नरळे, शशीकांत देवकांत, नितीन खोपकर, अनिल देवकर, शिमोन चांदेकर यांच्या पथकाने केली आहे.