महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माझ्या वडिलांमुळेच पुण्यातील काँग्रेस भवन वाचलं, नाहीतर इथं.... - काँग्रेस भवन हे १९९९ साली माझ्या वडिलांमुळेच वाचले

पुण्यातील काँग्रेस भवन हे १९९९ साली माझ्या वडिलांमुळेच वाचले. नाहीतर हे राष्ट्रवादी भवन झाले असते. माझे वडिल गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे गद्दार म्हणणाऱ्यांनी पक्षनिष्ठा आम्हाला शिकवू नये, असे वक्तव्य भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी केले.

sangram thopte
भोरचे आमदार संग्राम थोपटे

By

Published : Jan 1, 2020, 8:00 PM IST

पुणे - पुण्यातील काँग्रेस भवन हे १९९९ साली माझ्या वडिलांमुळेच वाचले. नाहीतर हे राष्ट्रवादी भवन झाले असते. माझे वडील गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे गद्दार म्हणणाऱ्यांनी पक्षनिष्ठा आम्हाला शिकवू नये, असे वक्तव्य भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी केले. मंत्रीपद न देण्याचा अधिकार हा पक्षश्रेष्ठींचा आहे, त्यामुळे त्यांचा निर्णय मला मान्य असल्याचेही थोपटे म्हणाले.

३० डिसेंबरला झालेल्या ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात अनेक ज्येष्ठ आमदारांना तिन्हीही पक्षांनी नाकारले. त्यामुळे काही आमदारांमध्ये नाराजीचा सुर आहेत. अशातच भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनाही मंत्रीमंडळात संधी मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. मात्र, त्यांना काँग्रेसने मंत्रीमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले. या नाराजीतून त्यांच्या समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनवर हल्ला करत कार्यालयाची तोडफोड केली. मात्र, तोडफोड केलेले कार्यकर्ते माझे नसल्याचा खुलासा संग्राम थोपटे यांनी केला.

माझ्या वडीलांमुळेच पुण्यातील काँग्रेस भवन वाचलं

आज (बुधवारी) सायंकाळी आमदार संग्राम थोपटे यांनी पुण्यातील काँग्रेस भवनला भेट दिली. तसेच तोडफोड झालेली पाहणीही केली. काँग्रेस भवनची तोडफोड करणारे कार्यकर्ते माझे नसल्याचे थोपटे यावेळी म्हणाले. तोडफोड करणारे कोण होते याचा मी देखील शोध घेत आहे. पक्षाने मला मंत्रीपद दिले नाही, पक्षश्रेष्ठींचा तो अधिकार आहे. त्यांचा हा निर्णय मला मान्य आहे. पक्ष यापुढे जी जबाबदारी देईल ती पार पाडणार असल्याचे थोपटेंनी सांगितले. दरम्यान कुठल्या पक्षाकडून मला कुठलीही ऑफर आली नसल्याचेही थोपटे म्हणाले. तसेच अनेक वेळा काँग्रेस सोडून परत काँग्रेसमध्ये कोण आलं हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे पक्षनिष्ठा काय असते ते आम्हाला शिकवू नये असेही थोपटे यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details