महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sambhaji Raje on Maratha Reservation: ...अन्यथा अध्यादेश काढून दिलेले आरक्षण ही फसवणूक -संभाजी राजे यांची सरकारवर टीका

Sambhaji Raje on Maratha reservation राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पुन्हा पेटला असून जालना येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे. तर दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा आक्रमक होत दोन जणांनी आत्महत्या देखील केली आहे. यावर स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे यांनी आपल मत व्यक्त केलं आहे

Sambhaji Raje on Maratha Reservation
Sambhaji Raje on Maratha Reservation

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 10:24 PM IST

Updated : Sep 8, 2023, 10:55 PM IST

मग आता कसे आरक्षण देणार

पुणेSambhaji Raje on Maratha reservation -माजी खासदार संभाजी राजे म्हणाले, सध्या मराठा आरक्षणासाठी जे काही सुरू आहे, ते पाहून मी खूप व्यथित झालो आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुन्हा मागासवर्गीय आयोग गठीत करावा. त्या आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवावे. मग आरक्षणाची रचना ठरवावी. तरच मराठा आरक्षण टिकेल. अन्यथा अध्यादेश काढून दिलेले आरक्षण ही फसवणूक ठरेल, असं स्पष्ट मत संभाजी राजे यांनी व्यक्त केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.


माजी खासदार संभाजी राजे म्हणाले, जरांगे पाटील अनेक वर्षांपासून लढत आहेत. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची मागणी होती. आता ते संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी करत आहेत. पण असे दिलेलं आरक्षण टिकंल का ? उच्च न्यायालयानं दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने का रद्द केले, हे ध्यानात घ्यायला हवे. कारण सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण नाकारताना तुम्ही पुढारलेले आहात, मागासवर्गीय नाहीत असं म्हटलयं. मग आता कसे आरक्षण देणार, हे आधी स्पष्ट करावे लागेल, असं यावेळी संभाजी राजे म्हणाले.


वकील परवडत नसल्यानं बदलले-ते पुढे ( Sambhaji Raje News) म्हणाले, आयोग गठीत करण्यासाठी तीन वेळा पत्रव्यवहार केला आहे. उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्रव्यवहार केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात वकील बदलण्यात आलं. मी याबाबत विचारले तर मला ऑफ रेकॉर्ड सांगण्यात आले की, आधीचे महागडे वकील परवडत नाहीत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं. पण काहीच चर्चा नाही. आता उपोषण सुरू असताना सरकार मत व्यक्त करत आहे. दीड वर्ष सरकारने काय केलं. मराठा समाजाला आरक्षण हे मागासवर्गीय आयोग गठित केल्यानंतर आणि त्याच्यानंतर मराठा समाजाला मागास ठरवूनच मिळणार आहे. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने दिलेला अहवाल महत्वाचा आहे.

मला सरकारला प्रश्न आहे की, तुम्ही मागासवर्गीय आयोग पुनर्गठीत करणार का ? त्या आयोगामार्फत मराठा समाज मागास ठरणार का? मग त्यानंतर कशा पद्धतीने आरक्षण देणार? मागील दीड- दोन वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारला अनेकदा पत्रव्यवहार करून याबाबत विचारणा केली. मात्र उत्तर देण्यात आलं नाही-माजी खासदार संभाजी राजे

गेले दीड वर्ष तुम्ही गप्प का बसलात?-राज्य सरकारच्या मराठा आरक्षण समन्वय समितीने आतापर्यंत काय केले हे सांगावे. सरकार लोकांच्या भावनांशी खेळतंय. मराठा समाजाला अध्यादेश काढून दिलेले आरक्षण टिकणार नाही. सरकारमधे अनेक जाणकार लोक आहेत. त्यांनी याची दखल घ्यावी. अन्यथा ही पुन्हा मराठा समाजाची फसवणूक ठरेल. संपुर्ण बहुजन समाजाला मदत झाली पाहिजे, ही शाहू महाराजांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. माझ्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाबाबत दोन टक्के अधिक माहिती आहे. मग गेले दीड वर्ष तुम्ही गप्प का बसलात? असा माझा त्यांना प्रश्न असल्याचं स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजी राजे यांनी म्हटलयं.

हेही वाचा-

  1. Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांनी घेतलं जमीनीत गाडून
  2. Maratha Reservation : आईच्या भेटीनं जरांगे पाटलांना अश्रू अनावर
Last Updated : Sep 8, 2023, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details