पुणे -केंद्र सरकारने शेतमालाला हमी भाव जाहीर करावा, दिल्लीतील किसान आंदोलकांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या आणि कृषी कायदा रद्द करावेत, या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (सोमवारी) हे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने कुठलीही चर्चा न करता बहुमत असल्याने कृषी कायदा संमत करून घेतला आहे. तसेच जे नवीन कायदे आणण्यात आले त्यात बऱ्याच त्रुटी जाणून बुजून ठेवण्यात आल्या आहेत. यात नवीन कायद्यानुसार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कुठेही विकता येऊ शकतो व सरकारने शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने स्वतंत्र दिले असे सांगण्यात येत आहे. मात्र, हे धांदांत खोटे व दिशाभूल करणारे असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळेच दिल्लीच्या सीमेवर गेल्या 11 दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा -'दिल्ली चलो' आंदोलनाचा १२वा दिवस; दररोज वाढतोय शेतकऱ्यांना देशभरातून मिळणारा पाठिंबा..
देश विकला तर याद राखा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे व्यापारी आहेत. त्यांनी देश विकायला काढला आहे. मात्र, याद राखा आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत. आम्ही गप्प बसणार नाही. यापुढे अजून तीव्र आंदोलन करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिला.
'भारत बंद'लाही पाठिंबा -
कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कृषी कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत, असे पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या या आवाहनाला राज्यातील विविध संस्था संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच संभाजी ब्रिगेडनेही भारत बंदला पाठिंबा दिला आहे.
आज राज्यभरात होतंय आंदोलन -