महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minister Chandrakant Patil : मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य, संभाजी ब्रिगेडचे जोरदार टीकास्त्र... - वादग्रस्त वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडची टीका

चंद्रकांत पाटील पैठणमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक वक्तव्य ( Minister Chandrakant Patil Statement ) केले. यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संघटक संतोष शिंदे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 9, 2022, 7:33 PM IST

पुणे : महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे होणाऱ्या वादांची मालिका सुरु आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रसाद लाड, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद नवीन असताना अजून एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे एक वक्तव्य चर्चेत ( Minister Chandrakant Patil Statment ) आहे. चंद्रकांत पाटील पैठणमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर पाटील यांच्यावर टीका ( Sambhaji Brigade leader critics ) केली जात आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर टीकेला सुरूवात

मंत्री चंद्रकांत पाटीलांवर जोरदार टीका: मंत्री चंद्रकांत पाटील ( Minister Chandrakant Patil ) यांच्या या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, "चंद्रकांत पाटलांसारखा कोल्हापूर मधून हाकलून दिलेला माणूस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार विसरला, महात्मा फुलेंनी शाळा काढली नसती तर चंद्रकांत पाटील आज कुठेतरी भीक मागत रस्त्यावर फिरले असते. कर्मवीर भाऊराव पाटलांचे उपकार आहेत. म्हणून चंद्रकांत पाटलासारखी माणसं मंत्री झाली परंतु या सगळ्यांचे उपकार आरएसएसच्या नादी लागून भाजपच्या लोक भटाळली.

मंत्रीमंडळातून हकालपट्टीची मागणी:मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांची बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे पुण्याला लागलेला कलंक आहे, अशा शब्दात टीका देखील यावेळी संतोष शिंदे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details