पुणे - छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे वढु बुद्रुक याठिकाणी समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले. मात्र काही वेळातच शिक्रापूर पोलिसांनी समाधीस्थळी दाखल होत भिडेंना समाधीस्थळी थांबण्यास मज्जाव केला. त्यानंतर भिडे देखील समाधीस्थळावरून मार्गस्थ होत शिरुर तालुक्यातील वाजेवाडी येथे एका दुर्घटनाग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आणि पुण्याकडे रवाना झाले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी संभाजी भिडे नतमस्तक; थांबण्यास पोलिसांकडून मज्जाव - शिवप्रतिष्ठान संभाजी भिडे
दंगलीपुर्वीपासून सहा वर्ष भिडे या परिसरात आले नसल्याचे सांगितले जात होते. शनिवारी (दि 9 ) भिडे यांनी अचानक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत भेट दिली.
सात वर्षानंतर महाराजांच्या समाधीस्थळी-
कोरेगाव भीमा व वढु बुद्रुक येथील दंगलीची देशभरात चर्चा झाली होती. या दंगलप्रकरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांचा हात असल्याचे चर्चा होती. मात्र दंगलीपुर्वीपासून सहा वर्ष भिडे या परिसरात आले नसल्याचे सांगितले जात होते. शनिवारी (दि 9 ) भिडे यांनी अचानक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत भेट दिली. याबाबत शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी समाधीस्थळी धाव घेतली आणि भिडे यांना वढु बुद्रुकला थांबण्यास मज्जाव केला.