पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात काही प्रमाणात सलून उघडण्यात आली आहेत. परंतु, दोन महिने सलून बंद असल्याने १ जूनपासून दरवाढ होण्याची शक्यता दुकान मालकांनी वर्तवली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून दाढी आणि केस न कापलेल्या नागरिकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये दोन महिन्यानंतर सलून सुरू; सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता
पिंपरी-चिंचवड शहराला रेड झोनमधून वगळण्यात आल्यानंतर अटी आणि शर्तीसह दुकाने उघडण्याची परवानगी महानगर पालिकेने दिली होती. त्यानुसार शहरातील दुकाने उघडली असून जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला रेड झोनमधून वगळण्यात आल्यानंतर अटी आणि शर्तीसह दुकाने उघडण्याची परवानगी महानगर पालिकेने दिली होती. त्यानुसार शहरातील दुकाने उघडली असून जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, सलून चालकांना महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकताच दिलासा दिला. सशर्त सलून उघडण्यास परवानगी दिली. त्यानुसार शहरातील बहुतांश सलून उघडले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून सलून बंद असल्याने काही प्रमाणात दुकानात गर्दी होत आहे. तसेच आत असलेल्या कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्क बांधून नियमांचे पालन केल्याचे पाहायला मिळाले. कात्रीसह इतर साहित्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सोशल डिस्टसिंगसह इतर नियमांचे पालन होत आहे.